सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्रातील निसर्गरम्य हिल स्टेशन्समध्ये महाबळेश्वरचा विशेष समावेश होतो.
हिरव्यागार टेकड्या, थंडावा देणारे वातावरण आणि मन मोहून टाकणारे दृश्य यामुळे महाबळेश्वर नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे.
महाबळेश्वरला भेट दिल्यानंतर पर्यटकांसाठी आणखी एक सुंदर पर्याय अगदी जवळच उपलब्ध आहे.
हे ठिकाण म्हणजे पाचगणी हिल स्टेशन, जे महाबळेश्वरपासून केवळ १९.८ किमी अंतरावर वसलेले आहे.
पाचगणी आपल्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यामुळे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. येथील गडद हिरवाई, शांत डोंगररांगा आणि स्वच्छ वातावरणामुळे मनाला वेगळाच ताजेपणा मिळतो.
पाचगणीतील डोंगराळ परिसर इतका मोहक आहे, की पर्यटकांना येथे फिरताना जणू ढगांमध्ये चालत असल्याचा भास होतो. यामुळेच पाचगणीला "ढगांचे गाव" असेही म्हटले जाते.
महाबळेश्वर ते पाचगणी हे अंतर फक्त १९.८ किमी असून रस्त्याने प्रवास करताना निसर्गाची अद्भुत दृश्ये अनुभवता येतात. त्यामुळे दोन्ही ठिकाणे एकत्र अनुभवण्याची संधी पर्यटक सहज साधू शकतात.