महादेवांची कृपा हवी आहे? सोमवारी नक्की करा हे उपाय

Monika Shinde

सोमवार

सोमवार हा दिवस भगवान शंकरांना अत्यंत प्रिय मानला जातो.

Benefits of Worshipping Mahadev on Somvar

|

esakal

काही सोपे उपाय

या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा आणि काही सोपे उपाय केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात व मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते.

Benefits of Worshipping Mahadev on Somvar

|

esakal

पवित्र जल अर्पण करा

सोमवारी पहाटे स्नान करून जवळच्या शिवमंदिरात जा. शिवलिंगावर स्वच्छ पाणी किंवा गंगाजल अर्पण करा. असे केल्याने मन शुद्ध होते व सकारात्मक ऊर्जा वाढते.

Benefits of Worshipping Mahadev on Somvar

|

esakal

बेलपत्र वाहा

महादेवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. शिवलिंगावर तीन पानांचे बेलपत्र अर्पण करताना मनात इच्छा व्यक्त करा. यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात.

Benefits of Worshipping Mahadev on Somvar

|

esakal

पंचामृताने अभिषेक करा

दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण करून महादेवांचा अभिषेक करा. हा अभिषेक आरोग्य, शांती आणि समृद्धीसाठी फलदायी मानला जातो.

Benefits of Worshipping Mahadev on Somvar

|

esakal

पांढऱ्या वस्तूंचे दान करा

सोमवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की तांदूळ, दूध, साखर किंवा पांढरे कपडे गरजू लोकांना दान करा. यामुळे चंद्रदोष शांत होतो असे मानले जाते.

Benefits of Worshipping Mahadev on Somvar

|

esakal

शिवचालिसाचे पठण करा

शिवमंदिरात किंवा घरी शुद्ध तुपाचा दिवा लावून श्रद्धेने शिवचालिसाचे पठण करा. यामुळे मनःशांती मिळते आणि महादेवांची कृपा सदैव राहते.

Benefits of Worshipping Mahadev on Somvar

|

esakal

2026 मध्ये कोणत्या राशींचं नशीब चमकणार?

येथे क्लिक करा