Shubham Banubakode
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे.
या महाकुंभ मेळ्यात लाखो भाविक आणि देश-विदेशातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
आपल्या वेगळेपणामुळे अनेक साधु, संत, महंत लक्ष वेधून घेत आहेत.
कुणी कठोर तपश्चर्येमुळे तर कुणी वेगळ्या वेशभुषेमुळे चर्चेत आहेत.
आता कुंभमेळ्यात रुद्राक्ष विकणाऱ्या एक मुलीची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
ही मुलगी नेमकी कोण आहे? आणि सोशल मीडियावर तिची चर्चा का?
कुंभमेळ्यात रुद्राक्ष विकणाऱ्या या तरुणीचं नाव मोनालिसा आहे.
ती मुळची मध्यप्रदेशच्या इंदौरची आहे.
सावळा वर्ण असलेली ही तरुणी तिचे सौंदर्य आणि बोलण्याच्या शैलीमुळे चर्चेत आहे.
सोशल मीडियावर अनेक जण तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.
अनेक जण तिची तुलना अभिनेत्री ऐश्वर्या राय बरोबर करत आहेत.
रुद्राक्ष विकतानाचे तिचे अनेक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिच्या व्हिडीओला जवळपास १५ मिलियन व्हूज मिळाले आहेत.