Shubham Banubakode
वाडियार राजघराण्याने 1399 पासून 1947 पर्यंत म्हैसूरवर राज्य केले. यदुराया वाडियार यांनी या राजवंशाची स्थापना केली.
वाडियार राजघराणं भारतातल्या जुन्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राजघराण्यांपैकी एक आहे. या घराण्याने कला, संस्कृती आणि आधुनिकीकरणाला प्रोत्साहन दिले.
यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार हे वाडियार राजवंशाचे 27 वे वंशज आणि आताचे राजे आहेत. त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्समधून शिक्षण घेतलं.
म्हैसूर पॅलेस भारतातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक राजवाड्यांपैकी एक आहे. वाडियार घराण्याद्वारे त्याचं ऐतिहासिक महत्त्व जपले जाते.
म्हैसूरचा दसरा उत्सव हा जगप्रसिद्ध आहे आणि वाडियार राजघराण्याने ही परंपरा शतकानुशतके जपली आहे. यावेळी शाही मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम होतात.
यदुवीर यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. ते म्हैसूरमधील शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देतात.
यदुवीर यांनी वन्यजीव संरक्षणासाठीही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यांनी दसरा उत्सवातील प्रसिद्ध हत्ती “अर्जुन” याच्या स्मारकासाठी प्रस्ताव ठेवला आहे.
वाडियार राजघराण्याला 1612 मध्ये विजयनगर साम्राज्याच्या राणी अलमेलम्मा यांनी दिलेला शाप होता. त्यामुळे या वंशात पुरुष वारस जन्माला येत नव्हते. 2017 मध्ये या घराण्यात पुत्र झाल्याने 400 वर्षांचा शाप संपल्याचे मानले जाते.