Saisimran Ghashi
महाराष्ट्रातील शाळेत CBSE पॅटर्न लागू होत आहे. तर नव्या शैक्षणिक धोरणाची A टू Z माहिती मिनिटांत जाणून घ्या.
नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी २०२५-२६ पासून टप्प्याटप्प्याने होईल.
बालभारती NCERT च्या अभ्यासक्रमानुसार राज्याच्या गरजेनुसार स्वतंत्र पाठ्यपुस्तकं तयार करणार आहे.
SCERT मार्फत इयत्ता १ ली ते १० वीचा अभ्यासक्रम तयार होणार आहे.
नव्या धोरणाअंतर्गत अंमलबजावणी, २०२५-२६: इयत्ता १ ली, २०२६-२७: इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी, २०२७-२८: इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी, ११ वी, २०२८-२९: इयत्ता ८ वी, १० वी, १२ वी
CBSE च्या सर्वंकष मूल्यांकन पद्धतीचा अवलंब केला जाईल. यात संकल्पनांवर भर, सतत मूल्यांकन (CCE) आणि व्यावहारिक ज्ञान यावर आधारित मूल्यांकन होईल.
नव्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृती, संत, समाजसुधारक आणि ऐतिहासिक व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. मराठी भाषा सर्व शाळांमध्ये अनिवार्य राहील, ज्यामुळे तिचा सन्मान आणि अभिजात दर्जा कायम राहील.
शालेय वेळापत्रक हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार ठरवले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती आणि अभ्यासाचे नियोजन प्रभावी होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळांमधील मुलांना १० वीपर्यंत आणि मुलींना १२ वीपर्यंत मोफत शिक्षण मिळेल.
नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. यासाठी ब्रिज कोर्सचा वापर करून अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे शिक्षक नव्या पद्धतीने शिक्षण देऊ शकतील.
शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, महाराष्ट्राची समृद्ध शैक्षणिक परंपरा लक्षात घेता राज्य मंडळ बंद होणार नाही. CBSE पॅटर्नचा अभ्यासक्रम स्वीकारला जाईल, पण १० वी आणि १२ वीच्या परीक्षा राज्य मंडळच घेईल.
CBSE च्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचे सतत मूल्यांकन (CCE) केले जाईल, ज्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित होईल. यामध्ये व्यावहारिक ज्ञान, सॉफ्ट स्किल्स आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यांचा समावेश होईल.
नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी उत्कृष्ट शिक्षण मिळेल. यामुळे त्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्यं मिळतील.