Monika Shinde
महाराष्ट्रीय जेवणात चटण्यांचा वेगळाच रंग आणि खास चव असते. या ५ पारंपरिक आणि स्वादिष्ट चटण्यांनी तुमच्या जेवणाला एक नवा उत्साह आणि रुचिरता मिळेल
लसूण, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि थोडं तेल यांचं मिश्रण असलेला ठेचा भाकरीसोबत अप्रतिम लागतो.
हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, आल्याचा बारका तुकडा, पुदिन्याची पाने, थोडंसं दही, जिरे आणि मीठ हे सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून तयार करतात. सँडविच, सामोसा यांसोबत खाण्यासाठी उत्तम.
भाजलेले शेंगदाणे, लसूण, लाल मिरची आणि मीठ यांची जादूकार चव वडापाव किंवा रोजच्या जेवणासोबत अप्रतिम लागते.
नारळाच्या किसलेल्या गर पाण्यात मसाले मिसळून तयार केलेली ही साधी पण चवदार चटणी भात, पोळी किंवा उपवासाच्या पदार्थांसोबत खूप स्वादिष्ट लागते.
ताजी कडीपत्ता आणि मसाल्यांनी बनलेली तिखट आणि सुगंधी कडीपत्ता चटणी वडापाव, भाजीपाला किंवा भातासोबत खाण्यासाठी अप्रतिम.