राहुल शेळके
महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते यशस्वी उद्योजकही होते. त्यांनी आपला व्यवसाय समाजहितासाठी वापरला.
फळे, फुले, भाजीपाला, गूळ विकून व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू त्याचा विस्तार केला.
रामचंद्र शिंदे आणि कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने त्यांनी कंपनी स्थापन केली. पूल, धरणांचे बांधकाम या माध्यमातून व्यवसाय फुलवला.
खडकवासला धरण, येरवडा पूल यांसारख्या प्रकल्पांत त्यांनी साहित्य आणि कामगार पुरवले.
आपल्या शेतात ऊस पिकवून त्याचा गूळ तयार करून विकला. यातून भरपूर नफा मिळवला.
त्यांनी आपल्या कवितेतून शेअर बाजारातील फसवणुकीवर भाष्य केले.
रोजगारासाठी पैसा नये गाठी ! अज्ञान्यास गाठी नफा हल!
शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी! पावतीत सारी जडीबुटी!
पैसे बुडाल्यास नाही त्यास दाद! सुका आशीर्वाद भटासाठी!
उचल्याच्या परी खिसे कातरिती ! तोंड लपविती जोती म्हणे!
शेअर्स काढून उद्योग करणे! हिशोब ठेवणे रोजकीर्द!
खतावणी सर्व बिनचूक ठेवी ! नफा तोटा दावी शोधी त्यांस!
महात्मा फुले यांनी 16 पुस्तके लिहिली. त्यातून दलित व महिलांसाठी सामाजिक जागृती घडवली.
1848 मध्ये वंचित घटकांसाठी "सत्यशोधक समाज" स्थापन केला. सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी संघर्ष केला.
महात्मा फुले यांनी व्यवसाय आणि समाजसुधार या दोन्ही क्षेत्रात नवा आदर्श घालून दिला – आजच्या युगासाठी प्रेरणास्थान!