धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी नक्कीच आवाज उठवेन, काय म्हणाले 'मविआ'चे उमेदवार?

सकाळ डिजिटल टीम

मार्च महिना संपला की, गावोगावच्या यात्रेची चाहूल लागते. यात्रेचा सण उत्सव म्हणजे आपल्या माणसांना एकत्र करण्याचा एक सोहळाच असतो.

Shashikant Shinde visit Vikasnagar Biroba Yatra

असाच सोहळा रंगतो, वाढतो आणि त्यातून एक समतेचा संदेश जातो तो म्हणजे बिरोबा देवाची यात्रा!

Shashikant Shinde visit Vikasnagar Biroba Yatra

रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातील विकासनगरमधील बिरोबा देवाच्या यात्रेला महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली.

Shashikant Shinde visit Vikasnagar Biroba Yatra

यावेळी त्यांनी बिरोबा देवाचे मनोभावे दर्शन घेत या महाराष्ट्राच्या आणि सातारच्या स्वाभिमानाच्या लढाईत बळ मिळो, अशी प्रार्थना केली.

Shashikant Shinde visit Vikasnagar Biroba Yatra

आमदार शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

Shashikant Shinde visit Vikasnagar Biroba Yatra

यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी धनगर समाजाचे प्रतीक असलेली घोंगडी - काठी - भंडारा लावून शिंदे यांचा सन्मान केला.

Shashikant Shinde visit Vikasnagar Biroba Yatra

यावेळी धनगर बांधवांशी संवाद साधत असताना समाज बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी मी नक्कीच आवाज उठवेन, असा विश्वासही शिंदेंनी या निमित्ताने दिला.

Shashikant Shinde visit Vikasnagar Biroba Yatra

उमेदवारी जाहीर होताच साताऱ्यात शिंदेंची जबरदस्त एन्ट्री; कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत