सकाळ वृत्तसेवा
भारतीय सैन्याचे पहिले परमवीरचक्र विजेते मेजर सोमनाथ शर्मा यांनी काश्मीरमधील श्रीनगर वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
हॉकी खेळताना मेजर शर्मा यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. डॉक्टरांनी विश्रांती सांगितली होती. पण त्यांनी युद्धभूमीत जायची परवानगी मागितली आणि ती मिळाली.
22 ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्तानी घुसखोर श्रीनगरवर कब्जा करणार होते. श्रीनगर एअरबेस वाचवणे हे खूप महत्त्वाचे होते.
2 नोव्हेंबरला बातमी मिळाली की घुसखोर बडगामपर्यंत पोहोचले. 3 नोव्हेंबरला मेजर शर्मा आणि त्यांची 50 जवानांची टीम बडगामला रवाना झाली.
मेजर शर्मांना समजले की खरा हल्ला पश्चिमेकडून होणार आहे. त्यांनी योग्य त्या ठिकाणी आपली तुकडी सज्ज ठेवली.
दुपारी 2:30 वाजता 700 कबिलाई लष्करांनी जोरदार हल्ला केला. मेजर शर्मा आणि त्यांचे 50 जवान तीन बाजूंनी वेढले गेले.
एका हातात प्लास्टर असूनही मेजर शर्मा लढत राहिले. ते सैनिकांपर्यंत मॅगझिन पोहोचवत होते, आणि प्रेरणा देत होते.
"दुश्मन फक्त 45 मीटर अंतरावर आहे. आम्ही शेवटची गोळी आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढू!" – हे मेजर शर्मांचा अंतिम मेसेज होता.
मेजर शर्मा आणि त्यांच्या 20 सैनिकांनी वीरमरण पत्करले. पण त्यांनी 6 तास घुसखोरांना रोखले आणि श्रीनगर वाचवले.
मेजर सोमनाथ शर्मा यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान 'परमवीरचक्र' बहाल करण्यात आला. त्यांच्या शौर्याची गाथा आजही अमर आहे.