संतोष कानडे
बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी संन्यास घेत आपलं पिंडदान केलं आहे.
प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात त्यांनी संन्यास घेतला. किन्नर आखाड्याने त्यांना महामंडलेश्वर ही उपाधी दिली.
किन्नर आखाड्याच्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी ममतांशी दीर्घ चर्चा केल्यानंतरच त्यांना तशी मुभा दिली.
नव्वदच्या दशकात ममता कुलकर्णी हे नाव देशभर गाजत होतं. पुढे त्यांनी तिरंगा, क्रांतिवीर, नसीब असे दर्जेदार सिनेमे केले.
ममत कुलकर्णी कायम चर्चेत राहिल्या ते त्यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे. त्यामुळेच त्यांना कामं मिळतात, असं बोललं जायचं.
छोटा राजनशी त्यांचे संबंध जोडले गेले होते. एवढंच नाही तर दुबईतला ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामीशी त्यांना लग्न केल्याचंही बोललं जातं.
ममता ह्या दहा वर्षे दुबईमध्येच होत्या. २०१३ मध्ये त्या पुन्हा भारतात परतल्या.
करिअरच्या सुरुवातीला १९९३ मध्ये ममता कुलकर्णी यांनी स्टारडम या मॅग्झिनसाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं.
या फोटोशूटमुळे देशभर गोंधळ माजला, या मॅग्झिनच्या कॉपी ब्लॅकमध्ये विकल्या गेल्या. कारण त्याकाळी अशा पद्धतीने फोटोशूट करणं दुर्मिळ होतं.
मोठा वाद उभा राहिल्यानंतर ममता कुलकर्णी यांच्यावर कोर्टात खटला दाखल केला गेला. त्यासाठी त्यांना कोर्टाने १५ हजारांचा दंड ठोठावला होता.