ऑफिसमध्ये अचानक मायग्रेनचा अटॅक आला तर करा 'हे' सोपे उपाय

Anushka Tapshalkar

बॉसशी बोला

मायग्रेन दिसत नाही, पण त्रास मोठा असतो. त्यामुळे HR किंवा मॅनेजरला तुमच्या स्थितीबद्दल प्रामाणिकपणे सांगा. आवश्यक असल्यास डॉक्टरचे नोंदपत्र द्या.

Talk to Boss

|

sakal

कामातील सोयी (Accommodations) मागा

मायग्रेनमुळे लक्ष केंद्रित करणे अवघड होते. त्यामुळे कामाचे तास बदलणे, कामाचे ओझे कमी करणे किंवा वर्क–फ्रॉम–होमची परवानगी मागू शकता.

Work From Home

|

sakal

ट्रिगर्सवर नियंत्रण ठेवा

जोरदार प्रकाश, आवाज आणि सुगंध हे मायग्रेनचे मोठे ट्रिगर्स. शक्य तितके हे टाळा आणि तुमच्या कार्यालयीन जागेला migraine-friendly बनवा.

Control Triggers

|

sakal

प्रकाश नियंत्रित करा

लॅपटॉपची ब्राइटनेस कमी करा, अँटी-ग्लेअर स्क्रीन लावा, क्यूबिकलमधील लाईट्स मंद ठेवा. शक्य नसेल तर कमी वॅटचे बल्ब मागा.

Less Lit Environment

|

sakal

आवाज कमी करा

दार बंद करा, क्यूबिकलला आवाजरोधक बनवा किंवा गरज असल्यास इअरप्लग किंवा व्हाइट नॉईज मशीन वापरा.

Avoid Noise

|

sakal

वासांपासून सावध

जोरदार परफ्यूम, क्लिनिंग स्प्रे किंवा केमिकल्स यांचा वास टाळा. तुमची सेंसिटिव्हिटी ऑफिस मॅनेजरला सांगा.

Stay Away From Smells

|

sakal

‘एस्केप रूम’ तयार ठेवा

रिकाम्या कॉन्फरन्स रूममध्ये किंवा ऑफिसमधील शांत जागेत थोडा वेळ अंधारात विश्रांती घ्या. छोटं ब्लँकेट आणि पिलो ठेवून द्या.

Escape Room

|

sakal

ऑफिस ड्रॉवरमध्ये मायग्रेन किट ठेवा

पेनकिलर्स, अँटी-नॉशिया मेडिसिन, कोल्ड पॅक, स्नॅक्स, पाणी – हे सर्व जवळ ठेवा. हायड्रेशन आणि नियमित खाणं खूप महत्वाचं.

Emergency Kit in Office Drawer

|

sakal

Chanakya Niti: कामाच्या ठिकाणी भरगोस यश मिळवण्यासाठी चाणक्य नीतितील ७ प्रभावी मंत्र

7 Mantras of Chanakya Niti for Great Workplace Success

|

Sakal

आणखी वाचा