संतोष कानडे
मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे बुधवारी अंतरवली सराटी येथून मुंबईकडे निघाले आहेत.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
राज्य सरकारने सगेसोयरे हा अध्यादेश लागू करावा, हैदराबाद, औंध, बॉम्बे गॅझेट लागू करावेत, यादेखील मागण्या आहेत.
२९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसतील.
राज्य सरकारने जरांगेंना केवळ एक दिवसाच्या उपोषणाची परवानगी दिलेली आहे.
असं असलं तरी मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय ते माघार घेणार नाहीत.
पैठण, अहिल्यानगर, कल्याणमार्गे मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल होणार आहेत.
उद्या म्हणजेच गुरुवारी ते मुंबईत आझाद मैदानामध्ये दाखल होतील. २९ ऑगस्टपासून त्यांचं उपोषण सुरु होणार आहे.