सकाळ ऑनलाईन
भाळी टिळा, नाकात नथ, हातात चुडा, पायात तोडे, गळ्यात साज अन् अंगावर नऊवारी असा देखणा मानसीचा लूक लक्ष वेधून घेतोय.
मानसी सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. लेटेस्ट फोटो शेअर करत ती आपल्या चाहत्यांना दर्शन देत असते.
आता अस्सल ग्रामीण मराठी स्त्रीचं रुप धारण करत तिनं नवं फोटोशूट केलंए.
या फोटोंमध्ये मानसी अत्यंत सुंदर दिसत असून तिचे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.
मानसीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचाही वर्षावर केला आहे. तिच्या या लूकचं तोंडभरुन कौतूकही केलंय.
भलामोठा वाडा अन् त्याच्या चौकात उभारलेलं तुळवी वृंदावन, अन् मानसीनं साकारलेलं मराठी स्त्रीचं सुंदर रुप म्हणजे....अप्रतिम!
मानसीनं या फोटोंसह छान कॅप्शनही दिल्या आहेत. 'आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त खचू नकोस' हे कॅप्शन तुम्हाला नवी प्रेरणा देईल.
वासराला चारा भरवतानाचा तिचा अंदाजही प्राणीप्रेमाचा संदेश देतो.
आपण प्रेम दिलं तर मुकं जनावरही आपल्याला प्रेम देतं हेच हा फोटो सांगतो.