चेहरा स्वच्छ करताना तुम्हीही या चुका करता का?

Aishwarya Musale

चेहऱ्याची चमक टिकवून ठेवण्यासाठी महिला अनेक घरगुती उपाय करतात आणि अनेक प्रोडक्ट्सचा वापरही करतात.

पण या सगळ्यामध्ये स्त्रिया अशा काही चुका करतात ज्यामुळे चेहरा खराब होतो आणि चेहरा साफ करताना या चुका होतात. बहुतेक महिलांना या चुका माहीत नसतात आणि काही वेळा या चुका करून चेहऱ्याची चमकही हरवते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स बद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमचा चेहरा साफ करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून चेहऱ्याची चमक कायम राहील आणि चेहऱ्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

चुकीच्या फेस वॉशचा वापर

अनेकदा स्त्रिया आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेस वॉशचा वापर करतात, परंतु जर तुम्ही चेहरा साफ करताना चुकीच्या फेसवॉशचा वापर केला तर त्यामुळे चेहऱ्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

साबणाचा वापर

चेहरा स्वच्छ करण्यासाठी नेहमी फेस वॉशचा वापर करायला हवा. अनेकांना हे माहीत असूनही लोक घाईत चेहरा साबणाने स्वच्छ करण्याची चूक करतात. त्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ शकते. 

मेकअपसह चेहरा धुणे

मेकअपसह चेहरा धुण्याची चूक करू नये. फेसवॉशने चेहऱ्यावरील मेकअप काढताना चेहऱ्यावर थोडासा मेकअप राहतो आणि त्यात केमिकल असते. त्यामुळे ही चूक करणे टाळा. 

गरम पाणी वापरणे टाळा

तसेच चेहरा स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर टाळा. गरम पाणी वापरल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी होते.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी टिप्स

माईल्ड फेस वॉश वापरा. मॉइश्चरायझर वापरा. चेहरा धुण्यापूर्वी हात धुवा.

'या' कुर्तींवर स्टाईल करता येईल नेटचा दुपट्टा...