सकाळ ऑनलाईन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात मराठ्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली अन् या मराठा साम्राज्यानं अटकेपार झेंडे रोवले.
पण दक्षिण भारताच्या सांस्कृतीक इतिहासातही मराठ्यांनी मोठं योगदान दिलं आहे, ते काय? जाणून घेऊयात.
शहाजीराजे यांच्या दूरद़ृष्टीतून महाराष्ट्र व तंजावर येथील राज्यांची निर्मिती झाली. यांपैकी महाराष्ट्र शिवरायांनी सांभाळला तर तंजावर व्यंकोजीराजेंनी.
तंजावरच्या मराठ्यांचा दरबार विद्वानांनी, कलावंतांनी गजबजलेला होता. तंजावरचे मराठी राजे स्वत: विद्वान अन् कलासक्त होते.
यामुळं मराठी वाङ्मय, नाट्य, नृत्य, कला व संगीत यात विस्मयकारक प्रगती तंजावरी होत होती. महाराष्ट्रापासून शेकडो योजने दूर मराठी संस्कृती आकार घेत होती.
याचं सर्व श्रेय तंजावरच्या मराठ्यांकडे जाते. महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांचे सातत्याने एकमेकांशी संबंध आले.
महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यभागी असल्यामुळं कर्नाटक, तेलंगण या सीमावर्ती प्रांतांशी एकमेकांचा प्रभाव एकमेकांवर पडला.
महाराष्ट्राचे तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवाह तिथल्या संस्कृतीत बेमालूमपणे समाविष्ट झाले.
तंजावरमध्ये भोसले राजवट एकशेऐंशी वर्षे होती. या काळात एकूण बारा राजे होऊन गेले.
तंजावरी मराठ्यांचा व परिणामी मराठी भाषेचा प्रवेश ही सांस्कृतिकदृष्ट्या युगप्रवर्तक घटना होती.
मिलिंद पराडकर लिखित आणि विवेक प्रकाशन प्रकाशित 'तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान' या पुस्तकात हे संदर्भ देण्यात आले आहेत.