संतोष कानडे
१७५७ मध्ये अब्दालीच्या दिल्लीवरील स्वारीनंतर मराठे दिल्लीत दाखल झाले. नेतृत्व होते राघोबादादा, मल्हारराव होळकर व साबाजी शिंदेंचे!
अब्दाली अफगाणिस्तानकडे परतला. मग मराठ्यांनी ठरवले—त्याचा पाठलाग करायचाच!
मराठ्यांनी लाहोर, मुलतान, अटक जिंकले. आजच्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर असणाऱ्या अटक किल्ल्यावर भगवा फडकवला!
राघोबादादा व मल्हारराव दिल्लीला परतले. साबाजीकडे १५ हजारांची फौज देऊन सीमांची रक्षा करण्याची जबाबदारी दिली गेली.
साबाजीने थेट पेशावर जिंकले! खैबर खिंड मराठ्यांच्या ताब्यात आली—अब्दालीची झोप उडाली.
अब्दालीने जहान खानला २५ हजार सैनिकांसह पाठवले. पण साबाजीने त्याचा धुव्वा उडवला.
साबाजीने खैबर खिंड १६ महिने राखली. शौर्य, रणनीती आणि धैर्याचे अजब उदाहरण दिले!
अब्दालीने स्वतः येऊन ५० हजार सैनिकांसह चाल केली. मात्र मराठ्यांची मदत पोहचली नाही.
स्थानिक शिख सरदारांनी साथ दिली नाही. धोका लक्षात घेऊन साबाजीने दिल्लीकडे माघार घेतली.
हजारो कोस दूर, अफगाण भूमीत भगवा फडकवणारा साबाजी शिंदे! नंतर त्याच्या नातवाला मानाजी शिंदेंना सरदारकी मिळाली.