Sandip Kapde
सध्या औरंगजेबाच्या थडग्याला घेऊन देशभरात वाद सुरू आहे. काही लोक त्याच्या ऐतिहासिक अस्तित्वाचे समर्थन करतात, तर काहींना ते पुसून टाकायचे आहे.
मराठ्यांनी त्यांच्या शत्रूंचे अस्तित्व नष्ट करण्याचा इतिहास घडवला आहे.
पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांनी नजीबखान रोहिलाच्या थडग्याची विटंबना करत त्याचा पूर्ण नायनाट केला होता.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांनी प्रचंड नुकसान सहन केले. मात्र, त्यांनी आपला सूड उगवण्याचा निश्चय केला.
नजीबखान रोहिलाने अफगाण लष्कराला मदत करून मराठ्यांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
पानिपतच्या पराभवानंतर महादजी शिंदे, मल्हारराव होळकर आणि माधवराव पेशवे यांनी उत्तर भारतात मराठ्यांची ताकद पुन्हा निर्माण केली.
नजीबखानच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला.
मराठ्यांनी या संधीचा फायदा घेत पत्थरगड किल्ल्यावर आक्रमण केले.
मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देऊ न शकल्यामुळे नजीबखानचा मुलगा झाबताखान मौल्यवान वस्तू घेऊन किल्ला सोडून पळून गेला.
मराठ्यांनी नजीबखानचे थडगे फोडून त्याच्या अस्तित्वाचा पूर्ण नायनाट केला.
सेनापती विसाजी पंत यांनी कबरीतील हाडे उधळून त्या जागी विजय नृत्य केले.
महादजी शिंदेंच्या आज्ञेवरून मराठ्यांनी संपूर्ण किल्ला जमीनदोस्त केला.
लाखोंचा ऐवज मिळवून झाबताखानाला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागली.
मराठ्यांनी आपल्या कट्टर शत्रूचे अस्तित्वच नष्ट केले.
आजही नजीबखानचे थडगे आणि पत्थरगड केवळ भग्न अवशेषांमध्येच अस्तित्वात आहेत.