मानधन बुडालं तरीही मृणाल शांतच होती...

सकाळ डिजिटल टीम

मागच्या काही वर्षांपासून पडद्याआड गेलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस पुन्हा चर्चेत आली आहे

त्याचं कारण ती एक नवीन मालिका करते आहे, त्यामुळे तिच्या मुलाखती प्रसारित होत आहेत

मन बावरे या मालिकेतील तिचं मानधन थकलं होतं, ते मिळालंच नव्हतं

त्यावेळी अनेकांनी सोशल मीडियात नाराजी व्यक्त केली होती, परंतु मृणालने जाहीर वाच्यता केली नव्हती

आता मृणालने त्याबद्दल भाष्य केलं आहे. ती म्हणते- ''आता या घटनेबाबत बोलून काहीच फायदा नाही. जो काही फायदा व्हायचा होता तो तेव्हा होणं गरजेचं होतं.''

''त्यावेळी मी नाजूक परिस्थितीमध्ये होते, तरीही मला मदत झाली नाही'' असं म्हणून तिने नाराजी व्यक्त केली

त्यामुळे आपण आता कधीच मंदार दादासोबत काम करणार नाही, असं ती म्हणाली

मृणालच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे, तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत