Monika Shinde
लग्न ही फक्त दोन व्यक्तींची नाही, तर दोन विचारांची भेट आहे. एक छोटी चर्चा आयुष्यभराचं नातं मजबूत करू शकते. ‘हो’ म्हणण्याआधी काही गोष्टी स्पष्ट करणे खूप महत्त्वाचे
प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी प्राधान्ये असतात. करिअर, कुटुंब, प्रवास किंवा छंद. एकमेकांचे ध्येय समजून घेणं नातं मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
पैसा हा नात्यातला संवेदनशील मुद्दा आहे. खर्च, बचत, कर्ज किंवा गुंतवणूक याबाबत प्रामाणिकपणे चर्चा केल्याने भविष्यातील गैरसमज टाळता येतात.
लग्नानंतरही स्वतःसाठी वेळ मिळणं गरजेचं आहे. जोडीदाराला वैयक्तिक स्वातंत्र्य दिलं तर नातं अधिक तणावमुक्त आणि संतुलित राहते.
सर्व नात्यांमध्ये चढउतार येतात. तणावाच्या प्रसंगी जोडीदार शांत राहतो की बोलून घ्यायला आवडतो, हे जाणून घेणं भविष्यकाळासाठी फायदेशीर ठरतं.
निरोगी सवयी, व्यायाम, संतुलित आहार आणि मानसिक स्वास्थ्य हे सगळं एकत्र जपणं महत्वाचं आहे. जीवनशैलीत साम्य असल्यास नातं अधिक आनंदी होते.