आता कामाचं टेन्शन विसरा! डेस्कवरच मिळणार मसाजची सुविधा

Amit Ujagare (अमित उजागरे)

कामाच्या ठिकाणी तणावाची तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याची पोस्ट व्हायरल झाली होती.

Photo : @yesmadam_official

यापार्श्वभूमीवर कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य कसं राखता येईल? यावर आता चर्चा घडून येत आहेत.

Photo : @yesmadam_official

यावर उपाय म्हणून 'येस मॅडम' या सलून होम सर्व्हिस कंपनीनं कर्मचाऱ्यांसाठी खास डी-स्ट्रेस लीव्हचा पर्याय आणला आहे.

Photo : @yesmadam_official

इंदूरस्थित या स्टार्टअप कंपनीनं कार्यालयीन वेळेतच कर्मचाऱ्यांना काही काळ मसाज देण्याची सोय केली आहे.

Photo : @yesmadam_official

हा एक वेलनेसचा उपक्रम असून कंपन्यांनी अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचा ताण दूर करण्यासाठी पावलं उचलण्यास हरकत नाही.

Photo : @yesmadam_official

येस मॅडमच्या प्रोफेशनल थेरपिस्टद्वारे मोफत मसाजची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

या कंपनीनं सुरु केलेल्या या उपक्रमाचा अनेक कर्मचाऱ्यांनी फायदा घेतला असून कामाच्या ठिकाणी मसाजमुळं आपल्या कार्यक्षमतेत सुधारणा झाल्याचं म्हटलं आहे.

Photo : @yesmadam_official

खरंतर भारतात हा प्रकार नवीनच असला तरी परदेशात कर्मचाऱ्यांसाठी या पद्धतींचा वापर करण्यात येत आहे.

Photo : @yesmadam_official