Pranali Kodre
बुंदेलखंड – हिऱ्याच्या खाणींनी भरलेला, पण वर्षानुवर्षे दुर्लक्षित प्रदेश. इथल्या इतिहासाने मात्र तेजस्वी पराक्रमाची गाथा लिहली – ती म्हणजे छत्रसाल बुंदेला!
छत्रसाल शिवाजी महाराजांना भेटला आणि त्यांच्याकडे सैन्यात प्रवेशाची विनंती केली. पण महाराजांनी त्याला प्रेरणा दिली – "स्वतःचे राज्य स्थापन कर!"
शिवरायांनी छत्रसालला तलवार भेट दिली. कवी भूषण यांनी या ऐतिहासिक प्रसंगाचे वर्णन आपल्या काव्यांतून अमर केले आहे.
औरंगजेबाने पाठवलेला फिदाईखान पराभूत झाला. छत्रसालचे पराक्रम पाहून इतर बुंदेले राजेही एकत्र आले.
छत्रसालांना संकट आले – खजिना रिकामा! मग आले गुरु प्राणनाथ प्रभु, त्यांनी सल्ला दिला – हिऱ्याच्या खाणी खोदा!
गुरुंचा आशीर्वाद खरा ठरला – जिथे छत्रसालचे घोडे गेले तिथे हिरा मिळाला! बुंदेलखंड श्रीमंत झाला.
बाजीरावाच्या काळात मुघलांनी छत्रसालवर बंगशला धाडले. वृद्ध छत्रसाल पराभूत झाले, पण त्यांनी शेवटचा डाव खेळला – बाजीरावाला पत्र!
बाजीरावाने बंगशला पराभूत केले. छत्रसाल खूश झाले – झाशीसह तृतीयांश राज्य आणि मस्तानी दिली भेट!
मस्तानी – सौंदर्यवती, रणरागिणी आणि बाजीरावाची प्रेमसंगिनी. तिच्या वंशजांना जहागिरी बहाल झाली.