सकाळ डिजिटल टीम
आजच्या धावपळीच्या जगात ताण- तणाव या सारख्या समस्या सहज जाणवतात.
तुम्ही ही अती विचार करत अलास तसेच तुमच्या मनावर ताण येत असेल तर या कडे दूर्लक्ष करू नका.
मानसिक आरोग्य बिघडण्या मागची कारणे आणि लक्षणे जाणून घ्या.
मानसिक विकारांची लक्षणे व्यक्तीपरत्वे बदलू शकतात, पण काही सामान्य लक्षणे आहेत ज्यांची नोंद घेणे आवश्यक मानले जाते.
सततचे दुःख, जास्त चिंता, भीती, किंवा चिडचिडेपणा, नैराश्य, किंवा आनंद कमी होणे. या सारख्या समस्या जाणवू शकतात.
गोंधळलेले विचार, लक्ष केंद्रित करण्यास किंवा निर्णय घेण्यास अडचण, विचित्र किंवा असामान्य विचार, भ्रम, किंवा वास्तव जगापासून दूर जाणे.
मित्र आणि कुटुंबापासून दूर राहणे, सामाजिक उपक्रमांमध्ये रस नसणे, एकटेपणा हवा हवासा वाटू शकतो.
भूक किंवा वजनात बदल, झोपेच्या समस्या (निद्रानाश किंवा जास्त झोप), थकवा, शरीरात दुखणे.
जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर मानसिक आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.