'एसटी'कडे होत्या 'मर्सिडीज बेंझ'च्या बसेस; काय आहे इतिहास?

संतोष कानडे

लालपरी

सामान्यांची जीवनवाहिनी म्हणून लालपरीकडे बघितलं जातं. कधीकाळी ही लालपरी निळीदेखील होती

मर्सिडीज बेंझ

सत्तर-ऐंशीच्या दशकामध्ये एसटी महामंडळाकडे मर्सिडीज बेंझ कंपनीच्या बसेस होत्या

परिवहन महामंडळ

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे अगदी १९८३-८४पर्यंत मर्सिडीजच्या बस होत्या

सोंगाड्या

१९७१मध्ये प्रदर्शित झालेल्या दादा कोंडके यांच्या सोंगाड्या चित्रपटात ही बस दाखवण्यात आलेली आहे

बस

काही फोटो गुगलवरदेखील उपलब्ध आहेत. एसटी महामंडळाचा समृद्ध वारसा सांगणारी ही बस आहे

सोशल मीडिया

ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे यांनी सोशल मीडियात निळ्या-पांढऱ्या बसचे फोटो शेअर केले आहेत

आठवणी

फोटोंसोबत त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिलेला आहे

महामंडळ

आज एसटी महामंडळाच्या ताफ्यात अशोक लिलंड, टाटा, व्होल्वो बस आहेत

इलेक्ट्रिक

यासह इलेक्ट्रिक आणि वाताणुकूलीत बस प्रवाशांच्या सेवेमध्ये उपलब्ध आहेत

व्हायरल

जुन्या मर्सिडीज बेंझ बसचे फोटो व्हायरल झाले आहेत