केळी आणि दूध एकत्र खाणे योग्य आहे का?

सकाळ डिजिटल टीम

आरोग्य

केळी आणि दूध एकत्र खाणे आरोग्यासाठी योग्य आहे का? केळी आणि दूध एकत्र खाल्यास आरोग्यावर कोणते परीणाम होतात जाणून घ्या.

Milk and Banana | sakal

कार्बोहायड्रेट्स

केळी आणि दूध दोन्हीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी किंवा नंतर हे खाल्ल्यास शरीराला झटपट ऊर्जा मिळते.

Milk and Banana | sakal

पोषक घटक

ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी हे एक चांगला पर्याय आहे. दोन्हीमध्ये कॅलरीज आणि पोषक घटक जास्त असल्याने वजन वाढण्यास मदत होते.

Milk and Banana | sakal

पोटॅशियम

दुधातील प्रथिने आणि केळीमधील पोटॅशियम स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी आणि त्यांना मजबूत बनवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

Milk and Banana | sakal

फायबर

केळीमध्ये असलेले फायबर पचनसंस्थेला मदत करतात आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी करण्यास मदत करतात.

Milk and Banana | sakal

पचनक्रिया

आयुर्वेदानुसार, दूध आणि केळी हे दोन्ही पचायला जड मानले जातात आणि त्यांची प्रकृती (तासीर) वेगवेगळी असते. त्यामुळे एकत्र खाल्ल्यास पचनक्रिया मंदावू शकते.

Milk and Banana | sakal

ॲलर्जी

काही व्यक्तींना या कॉम्बिनेशनमुळे त्वचेवर पुरळ उठणे किंवा इतर ॲलर्जीचे लक्षण दिसू शकतात.

Milk and Banana | sakal

व्यायाम

हे मिश्रण कोणत्याही वेळी खाण्याऐवजी, व्यायाम केल्यानंतर किंवा सकाळी नाश्त्यात घेणे अधिक चांगले मानले जाते. रात्री किंवा जेवणानंतर लगेच खाणे टाळावे.

Milk and Banana | sakal

पचनशक्ती

जर तुमची पचनशक्ती चांगली असेल आणि तुम्हाला कोणताही त्रास होत नसेल, तर तुम्ही केळी आणि दूध एकत्र खाऊ शकता. अन्यथा, हे दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या वेळी खाणे जास्त फायदेशीर ठरू शकते.

Milk and Banana | sakal

दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिंपळाचे पान चघळण्याचे आहेत 'हे' ७ फायदे

Pimpal Leaves Benefits | esakal
येथे क्लिक करा