Miraj Instrument : मिरजेच्या सतार, तानपुऱ्याला जीआय मानांकन; काय आहे तंतुवाद्याची खासियत?

सकाळ डिजिटल टीम

वजनाला हलके पण मजबूत लाकूड; जाड साल आणि मोठ्या पोकळीचा भोपळा वापरून संगीत नगरी मिरजेतील कारागिरांकडून बनवल्या जाणाऱ्या सतार व तानपुऱ्याला भौगोलिक मानांकन (G. I.) मिळाले आहे.

Miraj Instrument

तंतुवाद्य निर्मितीतील वैशिष्ट्य व गुणवत्ता या जोरावर हे यश मिळाले असून, संगीतनगरीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Miraj Instrument

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन अंतर्गत व्यापार विभागांतर्गत भौगोलिक संकेत नोंदणीद्वारे हे मानांकन मिळाले आहे.

Miraj Instrument

तानपुरा वाद्यास जीआय मानांकनासाठी सोलटून म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर या संगीतवाद्य निर्मिती कंपनीने, तर सतार वाद्यासाठी मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर संस्थेने प्रस्ताव सादर केला होता.

Miraj Instrument

या दोन्ही प्रस्तावांना मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे प्रमुख मोहसीन मिरजकर, मुबीन मिरजकर यांनी दिली. त्यामुळे जगभरातील संगीतक्षेत्रात मिरजेच्या तंतुवाद्यांचे मोल वाढणार आहे.

Miraj Instrument

श्रवणीय सुरावटींवर भौगोलिक मानांकनाची छाप उमटल्याने मिरज शहराची देशात वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

Miraj Instrument

सतार व तानपुरा वाद्यास जीआय मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या वाद्यांना मागणीही वाढणार आहे.

Miraj Instrument

तंतुवाद्य निर्यात आणि संगीतनगरी म्हणून मिरजेला पर्यटनाच्या नकाशावर आणण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे, असा विश्‍वास मिरजकर यांनी व्यक्त केला.

Miraj Instrument

Hupari Silver Jewelry : चांदीच्या 'हुपरी ब्रॅण्ड'ला GI ची झळाळी; काय आहे दागिन्यांची खासियत?