मुंगूस आणि उदमांजर यात काय फरक?

Varsha Balhe

मुंगूस आणि उदमांजर

मुंगूस आणि उदमांजर दिसायला काहीसे सारखे वाटतात; पण त्यांची शरीररचना, राहण्याची जागा आणि खाण्याच्या सवयी वेगळ्या आहेत.

Mongoose vs Civet

|

esakal

मुंगूस

मुंगसाचं शरीर सडपातळ, पाय आखूड आणि तोंड टोकदार असतं. त्याच्या अंगावर राखाडी किंवा तपकिरी रंगाचे केस असतात.

Mongoose vs Civet

|

esakal

उदमांजर

उदमांजराचं शरीर मांजरासारखं असतं. त्याच्या डोळ्यांभोवती काळे ठिपके आणि पाठीवर काळे पट्टे दिसतात.

Mongoose vs Civet

|

esakal

दिवसा की रात्री?

मुंगूस प्रामुख्याने दिवसा फिरताना दिसतं. तर उदमांजर रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतं.

Mongoose vs Civet

|

esakal

राहतात कुठे?

मुंगूस जमिनीवरील बिळांमध्ये आणि झुडपांमध्ये राहतं. उदमांजर झाडांवर, घरांच्या माळ्यावर किंवा कौलांमध्ये आश्रय घेतं.

Mongoose vs Civet

|

esakal

आहार

मुंगूस साप, उंदीर, कीटक, विंचू आणि अंडी खातं. तर उदमांजर फळं, बिया, कीटक आणि लहान प्राणी खातं.

Mongoose vs Civet

|

esakal

दोघांमध्ये मुख्य फरक काय?

मुंगूस हे प्रामुख्याने जमिनीवर वावरणारं शिकारी प्राणी आहे, तर उदमांजर झाडांवर चढण्यात पटाईत असून फळं आणि लहान प्राणी खातं. त्यामुळे दोघांना ओळखणं सोपं होतं.

Mongoose vs Civet

|

esakal

चक्क फक्त पांडा सांभाळण्यासाठी मिळतो लाखोंचा पगार

Panda Nanny Job

|

esakal

येथे क्लिक करा