Shubham Banubakode
यंदाचा मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे.
या पावसामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. पण मुंबईत दरवर्षी पाणी साचण्याची नेमकी कारण काय?
मुंबई ही सात बेटांवर वसलेली आहे. घाटकोपर ते भांडूपदरम्यानच्या टेकड्या, खाडी आणि सखल प्रदेश यामुळे पाण्याचा निचरा कठीण होतो, ज्यामुळे पुराची समस्या उद्भवते.
खारफुटी जंगले समुद्राच्या पाण्याचा वेग कमी करतात आणि पूर नियंत्रित करतात. मात्र, अतिक्रमण आणि बांधकामांमुळे खारफुटीच्या जंगलांचा नाश झाला आहे, ज्यामुळे पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे.
मुंबईची ब्रिटिशकालीन ड्रेनेज यंत्रणा आताच्या लोकसंख्येचा ताण ती पेलू शकत नाही. त्यामुळे मुंबई पावसाचं पाणी साचतं
मुंबईत इर्ला, हाजीअली, शिवडी आणि गजगरबंद येथे पंपिंग स्टेशन्स उभारली गेली आहेत. मात्र, भरतीच्या वेळी 27 फ्लड गेट्स बंद ठेवावे लागतात, ज्यामुळे पाणी समुद्रात जाऊ शकत नाही आणि शहरात साचते.
मुंबईतील मिठी, दहिसर, ओशिवरा आणि पोयसर या नद्या आता नाल्याच्या स्वरूपात आहेत. या नद्यांच्या ऱ्हास झाल्याने मुंबईत पाऊस साचतो.