पुजा बोनकिले
देशभरात पावसाचे आगमन झाले आहे.
पावसाळ्यात फॅशेनबल दिसायचे असेल तर काय करावं?
याबाबत अॅक्ट्रेस आणि ब्युटीशियन स्मिता शेवाळे यांनी पुढील खास टिप्स दिल्या आहेत.
नायलॉन, पॉलिस्टर यांसारखे कपडे वापरावे. जे पावसाळ्यात लवकर सुकतात आणि ओलसरपणातही आरामदायक राहतात.
पावसाळ्यात पाय घसरण्याची शक्यता असते अशावेळी तुम्ही क्रॉक्स, गम बूट्स वापरू शकता.
पावसाळ्यात चिखलाचे डाग किंवा अस्वच्छ पाण्याचे शिंतोंडे उडतात. अशावेळी तुम्ही पावसाळ्यात डार्क शेड्सचे निवड करू शकता. ज्य़ामुळे डाग दिसणार नाहीत.
ट्रान्सपरंट, प्रिंटेड किंवा पॉप-कलर रेनकोट्स आणि छत्र्या यांच्यामुळे पावसाळ्यात देखील तुम्हाला स्टायलिश लूक मिळतो
पावसाळ्यात मेकअपसाठी वॉटरप्रूफ प्रॉडक्ट्स वापर करा. यामुळे चेहरा देखील ग्लोइंग आणि फ्रेश दिसेल.