Anushka Tapshalkar
पावसाळा आला की ताप, सर्दी, खोकल्याचं प्रमाण वाढतं. हवामान बदलल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.
या दिवसांत सर्दी-खोकला हा सर्वसामान्य पण त्रासदायक आजार असतो. यावर घरगुती उपाय केल्यास लगेच आराम मिळू शकतो.
सुंठ गोळी हा एक पारंपरिक आणि प्रभावी उपाय आहे. घरात सहज मिळणाऱ्या साहित्यापासून या गोळ्या तयार करता येतात.
सुंठ पूड, गूळ, हळद आणि थोडंसं तूप. हे चार पदार्थ तुमच्या स्वयंपाकघरात हमखास सापडतील.
गूळ बारीक करून तुपात गरम करा आणि पातळ होऊ द्या. गॅस मंद आचेवर ठेवून सतत ढवळत राहा.
गूळ विरघळल्यावर त्यात सुंठ पूड व हळद घालून एकजीव करा. अर्धी वाटी गूळ असेल तर ३-४ चमचे सुंठ व १ चमचा हळद घाला.
मिश्रण थोडं घट्ट झालं की गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. हाताला तूप लावून छोट्या गोळ्या वळा.
गोळ्या वाळवून हवाबंद डब्यात ठेवा.
रोज एक गोळी घ्या. प्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करते!
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.