आला पावसाळा, तब्येतीला सांभाळा.!

Monika Lonkar –Kumbhar

पावसाळा

देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याचे दिसून येत आहे.

उकाडा

महाराष्ट्रात पावसाने मागील २-३ दिवसांपासून चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे, नागरिकांना या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. 

आरोग्य

पावसाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती ही अनेकदा कमकुवत होते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

सर्दी-खोकला

सर्दी-खोकल्यापासून दूर राहण्यासाठी आरोग्याची पुरेशी काळजी घ्या. गोळ्या औषधांसोबतच घरगुती उपाय करा.

घर स्वच्छ ठेवा

संसर्ग पसरवणाऱ्या अनेक प्रकारच्या विषाणूंपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे, संक्रमण टाळण्यासाठी पावसाळ्यात घर अवश्य स्वच्छ ठेवा. 

सकस आहार घ्या

विविध प्रकारच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करणे फार महत्वाचे आहे. अशा परिस्थितीमध्ये सकस आहार घ्या.

लसीकरण करा

पावसाळ्यात फ्लू, न्यूमोनिया आणि टायफॉईडसारखे सामान्य विषाणूजन्य संसर्ग रोखण्यासाठी तुम्ही लसीकरण करू शकता.

पाणी जमा होऊ देऊ नका

पावसाळ्यात घराच्या आसपास पावसाचे पाणी साचते. या साचलेल्या पाण्यात डेंग्यू आणि मलेरिया पसरवणाऱ्या डासांची पैदास होण्याचा धोका असतो. त्यामुळे,घराजवळ पाणी साचू देऊ नका.

चिंब भिजलेले, रूप सजलेले...!

Monsoon Travel Places | esakal