हवामान बदललंय... आजार टाळायचेत? मग 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

ढगाळ वातावरण

पावसाळी व आर्द्र हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला व व्हायरल इन्फेक्शनसारखे आजार वाढत आहेत.

Monsoon Health alert | Sakal

संसर्गजन्य आजार

डास व हवामान बदलामुळे साथीचे रोग पसरू शकतात, त्यामुळे स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Monsoon Health alert | Sakal

लक्षणे

ताप, खोकला, उलटी यांसारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपायांवर अवलंबून राहण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

Monsoon Health alert | Sakal

ज्येष्ठ नागरिकांनी

ज्येष्ठ नागरिकांनी धूळ व धूर टाळावा.गुडघेदुखी, संधिवात व दमा अशा आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.

Monsoon Health alert | Sakal

महिलांनी

महिलांनी त्वचा विकारांपासून बचावासाठी योग्य त्वचा काळजी घ्यावी. कोरडी त्वचा, फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी मॉइश्चरायझर व अँटिफंगल पावडर वापरावी.

Monsoon Health alert | Sakal

गर्भवती महिलांनी

गर्भवती महिलांनी सकस आहार घ्यावा.हिरव्या भाज्या, फळे, सूप व योग्य प्रमाणात व्यायाम व योगासनांचा अवलंब करावा.

Monsoon Health alert | Sakal

लहान मुलांना

लहान मुलांना थंड पदार्थ, जंकफूड देणे टाळावे. त्यांना तुळस-आलं-मध यांसारखे आयुर्वेदिक उपाय व व्हिटॅमिन C युक्त फळे द्यावीत.

Monsoon Health alert | Sakal

स्वच्छता

सर्वांनीच स्वच्छता व प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्यावा. कोमट पाणी प्यावे, वेळेवर जेवण घ्यावे आणि पुरेशी झोप घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Monsoon Health alert | Sakal

मातृदिनाच्या प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या अन् मनाला भिडणाऱ्या 10 शायरी

Mother’s Day Shayari | Sakal
येथे क्लिक करा