Monsoon Season : निरोगी पावसाळ्यासाठी आहारात हव्या 'या' औषधी रानभाज्या

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवून येतात. त्यांची लागवड न करता त्या उगवल्याने त्यांना खतांची आवश्यकता नाही. किडीचा, रोगांचा प्रादुर्भाव नसल्याने आरोग्याला अत्यंत उपयुक्त ठरतात.

Wild Vegetables

घोळ : शेतात तण म्हणून उगवणारी ही वनस्पती काढून टाकली जाते. घोळ ही मूळव्याधासाठी गुणकारी असून रक्तशुद्धी, मूत्रपिंड, दातांतून रक्त जाण्यावर उपयोगी ठरते.

Wild Vegetables

टाकळा : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात माळरानावर नजरेस पडणारी रोपवर्गीय वनस्पती म्हणजे टाकळा. हृदयविकार, खोकला, श्वसनविकार, खरूज, वात, कफदोष कमी करण्यासाठी भाजी खावी.

Wild Vegetables

शेवगा : शेवग्याची पाने, शेंगा, बिया, मूळ, फुले या सर्वातच औषधी गुणधर्म आहेत. दुधापेक्षा चौपट कॅल्शियम, तीन केळांइतके पोटॅशियम, सहा संत्र्यांइतके 'क' जीवनसत्त्‍व आढळून येते. शेवग्याने मधुमेह, उच्च रक्तदाब सारख्या आजारात फायदा होतो.

Wild Vegetables

मायाळू : लाल व नाजूक देठ, जांभळट, करडी, हिरवट पाने, पानांच्या बेचक्यातून उगवणारी अशा मायाळूचा वेल तुमच्या घराशेजारी परसात, कुंडीत उगवू शकतो. अंगावर पित्त उठल्यास याची पाने चोळतात. कफकारक, पौष्‍टिक व ज्वरनाशक अशी ही वनस्पती आहे.

Wild Vegetables

केना : नाजूक खोड व जमिनीवर परसत वाढणारा केना पावसाळ्यात मुबलक मिळतो. केनाच्या कोवळ्या पानांची भाजी बनविता येते. पचनास हलकी असल्याने मलावरोधाचा त्रास कमी करतात.

Wild Vegetables

साडीत 'या' अभिनेत्रीचा स्टायलिश अंदाज; सोशल मीडियावर 'ग्लॅमरस' फोटो व्हायरल