Aarti Badade
पावसाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
पावसाळ्यात ओलसर कपडे, विशेषतः अंतर्वस्त्रे घातल्याने जांघेमध्ये जंतुसंसर्ग होऊन खाज व आग होऊ शकते.
हे टाळण्यासाठी नेहमी वाळलेले, कोरडे कपडे घालावेत.
१-२ चमचे त्रिफळा चूर्ण २ ग्लास पाण्यात उकळून जांघेची जागा धुवावी, कोरडी करून पावडर लावावी.
पायाला चिखल्या झाल्या असल्यास याच त्रिफळा चुर्णाच्या पाण्याचा वापर करावा आणि सूक्ष्म त्रिफळा गोळ्या पोटातून घ्याव्यात.
दमटपणामुळे येणारा घाम वारंवार पुसला पाहिजे.
मधुमेहींनी बाहेर जाताना बूट-चप्पल घालावी आणि सोबत हळद पावडर-कापूस ठेवावा जेणेकरून जखमेवर त्वरित लावून संसर्ग टाळता येईल.