सकाळ डिजिटल टीम
पावसाळा ऋतू सर्वांना आनंददायी वाटतो, मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे हवा आर्द्र होते आणि कपडे लवकर सुकत नाहीत.
अशा परिस्थितीत ओले कपडे किंवा ओली अंतर्वस्त्र घातल्याने अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात, विशेषतः युटीआय (मूत्रमार्गातील संसर्ग) होण्याचा धोका वाढतो.
पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे अंतर्वस्त्र पूर्णपणे सुकत नाहीत.
ओलसर वातावरणात बॅक्टेरिया व बुरशीची वाढ जलद होते.
जननेंद्रियाजवळ ओलावा जास्त काळ टिकल्याने संसर्गाचा धोका वाढतो.
सिंथेटिक फॅब्रिक वापरल्यास हवा बाहेर जात नाही आणि ओलावा अधिक काळ टिकून राहतो.
युटीआय हा मूत्रमार्गातील संसर्ग असून तो महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. संशोधनानुसार, ५०-६० टक्के महिलांना आयुष्यात एकदा तरी हा त्रास होतो. विशेषतः ६० वर्षांवरील महिलांमध्ये हा धोका अधिक असतो.
वारंवार लघवी होणे
लघवी करताना जळजळ किंवा वेदना
अस्वस्थता किंवा जडपणा जाणवणे
ताप येणे
नेहमी कोरडी आणि स्वच्छ अंतर्वस्त्र घालावीत.
सिंथेटिक फॅब्रिकऐवजी कापडी अंतर्वस्त्र वापरावीत.
पावसाळ्यात कपडे योग्यप्रकारे वाळवूनच परिधान करावेत.
शरीरातील पीएच संतुलन राखण्यासाठी स्वच्छता पाळावी.