Aarti Badade
सकाळी चालण्यामुळे दिवसाची सुरुवात अॅक्टिव्ह आणि उत्साही पद्धतीने करण्यास मदत होते. शरीर आणि मन दोन्ही फ्रेश वाटू शकतात.
सकाळच्या वॉकमुळे मूड चांगला राहण्यास आणि दिवसभर ऊर्जा जाणवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करता येते.
दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी चालणे हा देखील उत्तम पर्याय आहे. यामुळे दिवसभराचा थकवा आणि तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.
रात्रीच्या जेवणानंतर हलकं चालणंही चांगली सवय ठरू शकते. जेवणानंतर थोडं चालल्याने पचनक्रियेला मदत होऊ शकते.
उन्हाळ्यात कडक ऊन टाळण्यासाठी सकाळी लवकर किंवा सायंकाळी चालण्याची वेळ निवडणे अधिक सोयीचे ठरते.
वॉकचा फायदा फक्त सकाळी किंवा संध्याकाळी चालण्यावर अवलंबून नसतो. दररोज नियमित चालणे आणि सक्रिय जीवनशैली ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.
तुमच्यासाठी जी वेळ रोज सहजपणे पाळता येईल, तीच वॉकसाठी सर्वोत्तम वेळ! सकाळ असो वा संध्याकाळ, नियमित चालण्याची सवय लावणे महत्त्वाचे आहे.