Mansi Khambe
एखाद्या व्यक्तीला खूपच डास चावतात. आजुबाजूला अनेक लोक बसले असतानाही डास एखाद्या विशेष व्यक्तीलाच सतत चावततात. यामागचे कारण काय आहे?
Mosquitoes Taste
ESakal
डासांची एक पसंती असते. ज्या माणसाची 'टेस्ट' त्याला आवडली, त्यांनाच ते जास्त चावतात, असा दावा केला जातो. या डासांच्या पसंतीचे गूढ उलगडणारे एक रंजक संशोधन समोर आले आहे.
Mosquitoes Taste
ESakal
फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, मियामी येथील संशोधकांनी एडीस एजिप्ती, एडीस अल्बोपिक्टस आणि क्युलेक्स क्विन्क्विफॅसिएटस या तीन प्रजातींच्या डासांना शरीरगंधाच्या संपर्कात आणले.
Mosquitoes Taste
ESakal
या संशोधनात प्रत्येक डास प्रजातीची पसंती वेगळी असल्याचे उघड झाले. एडीस एजिप्ती डासाची पुरुषांकडे किंचित अधिक आकर्षण दाखवले. तर काही व्यक्तींकडे एकापेक्षा अधिक प्रजातींचे डास आकर्षित झाले.
Mosquitoes Taste
ESakal
कोरिनेबॅक्टेरियम केफिररेस्डेंटी, क्युटिबॅक्टेरियम ग्रॅन्युलोसम आणि स्टॅफिलोकोकस एपिडर्मिस या प्रकारच्या जीवाणूंमुळे तयार झालेला गंध तिन्ही प्रजातींच्या डासांसाठी अधिक आकर्षक ठरलेल्या व्यक्तींमध्ये आढळला.
Mosquitoes Taste
ESakal
हे जीवाणू डासांना आकर्षित करणारे विशिष्ट गंध निर्माण करण्यात भूमिका बजावतात, असा संशोधकांनी अंदाज व्यक्त केला आहे.
Mosquitoes Taste
ESakal
तसेच संशोधकांनी स्वयंसेवकांच्या त्वचेवरील जीवाणू आणि हवेत मिसळलेल्या रासायनिक घटकांचेही परीक्षण केले असता एडीस एजिप्ती आणि क्युलेक्स क्विन्क्विफॅसिएटस हे डास त्वचेचा गंध कमी असलेल्या व्यक्तींकडे अधिक आकर्षित होत असल्याचे दिसले.
Mosquitoes Taste
ESakal
तर एडीस अल्बोपिक्टस हा वनस्पतीसदृश गंध असलेल्या १३ रासायनिक घटकांकडे आकर्षित झाला.
Mosquitoes Taste
ESakal
दृष्टी, शरीराची उष्णता आणि गंध यांच्या आधारे डास माणसांचा शोध घेतात.
Mosquitoes Taste
ESakal
मानवी शरीराच्या गंधात एक हजारहून अधिक रसायने असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा शरीरगंध वेगळा असतो आणि त्यानुसार डासांचे आकर्षण बदलते.
Mosquitoes Taste
ESakal
Salary Saving Tips
ESakal