कोणत्या देशाचे सर्वाधिक खेळाडू 100 पेक्षा जास्त कसोटी खेळलेत?

अनिरुद्ध संकपाळ

कसोटी क्रिकेट जगतात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा दबदबा आहे. 100 पेक्षा जास्त कसोटी खेळणारे सर्वात जास्त खेळाडू देखील या देशांचेच आहेत.

इंग्लडचे आतापर्यंत 16 खेळाडू हे शंभर किंवा शंभरपेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत.

त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियाचे 15 खेळाडू हे 100 पेक्षा जास्त कसोटी खेळले आहेत.

भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताचे आतापर्यंत 13 खेळाडू 100 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी खेळले आहेत.

वेस्ट इंडीजचे 9 खेळाडू 100 पेक्षा जास्त कसोटी खेळले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचे 8 खेळाडू 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत.

श्रीलंकेचे 6 खेळाडूंनी 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळण्याचा कारनामा केला आहे.

पाकिस्तानचे आतापर्यंत 5 खेळाडू हे 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. तर न्यूझीलंडचे आतापर्यंत 4 खेळाडू 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत.

ध्रुव जुरेल पदार्पणाचा कसोटी सामना वडिलांना का करतोय समर्तिप?