कसोटीत सर्वाधिक चौकार मारणाऱ्या टॉप-५ फलंदाजांमध्ये दोन भारतीय

Pranali Kodre

कसोटी क्रिकेट

कसोटी क्रिकेट म्हटलं की सर्वांना फार मोठे शॉट्स नसलेली, जोखीम न घेता केलेली संयमी फलंदाजी असं पटकन डोक्यात येतं. असे असले तरी कसोटीमध्येही अनेकांना मोठे शॉट्स खेळले आहेत.

Rahul Dravid | Sakal

दोन भारतीय

कसोटीत सर्वाधिक चौकार मारणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये तर पहिल्या दोन क्रमांकावरच भारतीय नावं आहेत.

Sachin Tendulkar - Rahul Dravid | Sakal

सर्वाधिक चौकार

कसोटीत ११ जानेवारी २०२५ पर्यंत सर्वाधिक चौकार मारणाऱ्या पहिल्या ५ फलंदाजांबद्दल जाणून घेऊ.

Kumar Sangakkara | Sakal

५. कुमार संगकारा

श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराने १३२ कसोटी सामन्यांमध्ये १४९१ चौकार मारले असून तो या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

Kumar Sangakkara | Sakal

४. रिकी पाँटिंग

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने १६८ कसोटी सामन्यांमध्ये १५०९ चौकार मारले आहेत.

Ricky Ponting | Sakal

३. ब्रायन लारा

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा आहे. त्याने १३१ कसोटी सामन्यांमध्ये १५५९ चौकार मारले आहेत.

Brian Lara | Sakal

२.राहुल द्रविड

भारताचा 'द वॉल' राहुल द्रविड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १६४ कसोटी सामन्यांमध्ये १६५४ चौकार मारले आहेत.

Rahul Dravid | Sakal

१. सचिन तेंडुलकर

या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने २०० कसोटी सामन्यांमध्ये २०५८ चौकार मारले आहेत.

Sachin Tendulkar | Sakal

सचिन अव्वल

सचिन कसोटीत २००० हून अधिक चौकार मारणारा सध्यातरी एकमेव खेळाडू आहे.

Sachin Tendulkar | Sakal

युजवेंद्र चहलची आहे करोडोंची संपत्ती

Yuzvendra Chahal | Instagram
येथे क्लिक करा