IPL मध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक धावा काढणारे टॉप-3 क्रिकेटर

प्रणाली कोद्रे

मुंबई इंडियन्सचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेतील 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 29 धावांनी विजय मिळवला.

Romario Shepherd | IPL 2024 | Sakal

रोमरियो शेफर्ड

मुंबईच्या या विजयात रोमरियो शेफर्डने मोलाचा वाटा उचलला. तो या सामन्यात 390 च्या स्ट्राईक रेटने 10 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 39 धावांवर नाबाद राहिला.

Romario Shepherd | IPL 2024 | Sakal

रोमरियो शेफर्डची फटकेबाजी

रोमरियो शेफर्डने मुंबईकडून डावाच्या 20 व्या षटकात 4 षटकात आणि 2 चौकारांसह तब्बल 32 धावा चोपल्या.

Romario Shepherd | IPL 2024 | Sakal

दुसरा क्रमांक

त्यामुळे आयपीएलमध्ये डावाच्या 20 व्या षटकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शेफर्ड दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

Romario Shepherd | IPL 2024 | Sakal

अव्वल क्रमांक

आयपीएलमध्ये डावाच्या 20 व्या षटकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर रविंद्र जडेजा आहे.

Ravindra Jadeja | X/ChennaiIPL

रविंद्र जडेजा

जडेजाने 2021 आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुविरुद्ध 20 व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर 37 धावा काढल्या होत्या.

Ravindra Jadeja | X/ChennaiIPL

रिंकू सिंग

तसेच या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रिंकू सिंग असून त्याने आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना यश दयालच्या गोलंदाजीवर 20 व्या षटकात 31 धावा चोपल्या होत्या.

Rinku Singh | IPL | X/IPL

एकाच ओव्हरमध्ये 3 नो-बॉल! लखनौच्या गोलंदाजाचा लाजिरवाणा विक्रम

M Siddharth | IPL 2024 | X/LucknowIPL