RR विरुद्धच्या मॅचनंतर धोनीसह CSK च्या खेळाडूंना का दिले मेडल्स?

प्रणाली कोद्रे

चेन्नई सुपर किंग्सचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेत 61 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवला.

Rachin Ravindra - Ruturaj Gaikwad | Sakal

घरचं मैदान

हा सामना चेन्नईचं घरचं मैदान एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) झाला.

Daryl Mitchell - Ruturaj Gaikwad | Sakal

50 वा विजय

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा हा चेपॉकच्या मैदानातील 71 सामन्यांतील 50 वा विजय होता.

Chennai Super Kings | X/ChennaiIPL

अखेरचा साखळी सामना

तसेच चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2024 मधील घरच्या मैदानातील अखेरचा साखळी सामना होता.

Chennai Super Kings | X/ChennaiIPL

चाहत्यांना स्टेडियममध्ये थांबण्याची विनंती

त्यामुळेच सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापकांनी चाहत्यांना सामन्यानंतर काही वेळ स्टेडियममध्येच थांबण्यास सांगितले होते.

CSK Fans | Sakal

मेडल देऊन सन्मान

सामन्यानंतर चेन्नईच्या संघव्यवस्थपनाने चेपॉकवरील 50 व्या विजयाबद्दल खेळाडूंचा मेडल देऊन सन्मान केला.

Chennai Super Kings | X/ChennaiIPL

चाहत्यांनाही भेट

यानंतर खेळाडूंनी चेन्नईचे मर्चंडाईज (merchandise) स्टेडियमवरील चाहत्यांना भेट दिले.

MS Dhoni | Chennai Super Kings | X/ChennaiIPL

IPL: सलग 10 व्यांदा, तर एकूण 15 व्यांदा पंजाब किंग्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

Punjab Kings | Sakal