संतोष कानडे
पोर्तुगिज व्यापारी मैनरिक याने मुघलांच्या शाही खानपाणाबद्दल 'ट्रॅव्हल्स ऑफ फ्रे सेबेस्टियन मैनरिक' या पुस्तकामध्ये लिहिलं आहे.
तो लिहितो शाही भोजनामध्ये दररोज कुठले व्यंजनं बनवायचे, या ठरवण्याचा अधिकार हकीम करत असत. या खानपाणामध्ये औषधींचा वापर केला जात असे.
जसं की, भाताला चांदीचं वर्क केलं जात असे. चांदीचं वर्क पचनक्रियेसाठी लाभदायी समजलं जातं. तसंच ते कामोत्तेकही असतं.
हकीमाने मेन्यू ठरवला की खानसामे सक्रिय होत असत. मुघलांकडे जेवण तयार करण्यापासून ते मदतीसाठी शेकडो नोकर होते.
मुघलांसाठी जो स्वयंपाक बनला जात असे त्यासाठी गंगा नदीच्या पाण्याचा वापर होई. तसेच पावसाचं फिल्टर केलेलं पाणी वापरलं जात असे.
मुघलांचे स्वयंपाकी जेव्हा जेवण बनवत असत तेव्हा त्याचा सुगंध दूरपर्यंत दरवळत असे. शाही भोजन हे कायम चांदीच्या भांड्यांमध्ये वाढलं जात होतं.
मुघलांना जेवण देण्यापूर्वी अन्नाची विष परीक्षा होत असे. त्यासाठी जेड स्टोनचा वापर केला जायचा. जमिनीवर उंची चादर अंथरुन दस्तरखान सजवलं जात होतं.
जेवणापूर्वी मुघल बादशहा देवाचं स्मरण करत असायचे. जेवण झाल्यानंतरही देवाचं स्मरण होई. त्यामुळेच त्यांना जेवणासाठी खूप वेळ लागायचा.
जेव्हा मुघलं भारतात आले तेव्हा ते त्यांना त्यांच्या परंपरेतलं जेवणं आवडायचं. कालांतराने त्यांच्या जेवणात काश्मिरी वडी, सुपारी, पांढरा भोपळा आणि बत्तासा; याचा समावेश झाला.
केळी आणि इतर फळंदेखील त्यांच्या दैनंदिन जेवणाचा भाग झाला. बहुतेक मुघल सम्राटांना आंबा आणि खरबुज विशेष आवडत असत.
त्यामुळेच बकऱ्याच्या मांसामध्ये तांदूळ आणि आंबा टाकला जाई. मुघलांनी भारतीय पदार्थांमध्ये त्यांचे पारंपारिक पदार्थ मिसळून अनेक नवीन व्यंजनं तयार केली.