'हा' मुघल बादशाह गोपूजा करून काश्मिरमध्ये साजरी करायचा दिवाळी

संतोष कानडे

मुघल

मुस्लिम असूनही एखाद्या मुघल राजाने गोपूजा केली असेल, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे.

अबूल फजल

अबूल फजलने आपल्या पुस्तकामध्ये अकबराच्या काळातल्या दिपावलीचं वर्णन केलेलं आहे.

अकबर

जेव्हा अकबर बादशहा काश्मीरमध्ये असायचा तेव्हा तो दिपावली साजरी करायचा आणि गोपूजाही करायचा.

अबू फजल

अबू फजलने लिहिलंय की, दिपावलीचं पर्व मोठ्या हर्षोल्हासात साजरं केलं जात असे.

हुकूमनामा

हुकूमनामा जारी करुन नोकरांकडून नदी तट आणि इमारतींच्या, घरांच्या छतांवर दीप प्रज्वलीत केले जायचे.

दिपावली

दिपावलीच्या दिव्यांमुळे सर्वत्र उजेड व्हायचा आणि वातावरण अल्हाददायक असायचं.

राजमहल

दिवाळीमध्ये राजमहलात जुगार खेळण्यास परवानगी दिली जायची. दिवाळीनंतर गोवर्धनपूजा केली जायची.

गोवर्धनपूजा

मुघल काळामध्ये गोवर्धनपूजा मोठ्या श्रद्धेने साजरी होत असे. गायींची पूजा केली जायची.

गोसेवा

या दिवशी गोसेवा केली जायची. गायींना आंघोळ घालून, सजवून पूजा व्हायची.

शहेंशाह

दस्तुरखुद्द शहेंशाह अकबर या सोहळ्यामध्ये सहभागी होत असत. त्यांच्यासमोर अनेक गायींना आणलं जत असे.