मुघल दरबारात होती २० हजार कबुतरं, त्यांना खायला दिल जायचं 'हे' धान्य

Shubham Banubakode

संदेशवहनासाठी वापर

प्राचीन काळापासून कबुतरांचा वापर संदेशवहनासाठी केला जातो आहे. मुघल कालखंडही त्याला अपवाद नव्हता.

Mughal Empire's 20,000 Pigeons

कसा होत होता कबुतराचा वापर?

मुघलांच्या काळात कबुतरांचा वापर संदेश पोहोचवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी केला जाता होता.

Mughal Empire's 20,000 Pigeons

कुठून आणली जायची कबुतरे

मघल दरबारात इतर देशांमधून कबुतर आणली जात होती. अकबराने फरगण्याहून कबुतर आणली होती. सोबतच कुशल कबुतर-पालकही आणले होते.

Mughal Empire's 20,000 Pigeons

दरबारात किती कबुतरं होती?

अकबरच्या दरबारात एकूण २०,००० कबुतरे होती, त्यापैकी ५०० अकबरची खास कबुतर होती. अकबर छावणीबरोबर कबुतरही बरोबर घेवून जात होता.

Mughal Empire's 20,000 Pigeons

किती खाद्य दिलं जाई?

मुघल काळात १०० उडत्या कबुतरांसाठी चार शेर धान्य दिले जात होते, तर इतर कबुतरांसाठी पाच शेर धान्य दिले होते. जर ती जोडीने ठेवली असतील, तर ७.५ शेर धान्य दिले जात होते.

Mughal Empire's 20,000 Pigeons

कुबतरांचं खाद्य

उडत्या कबुतरांना फक्त बाजरी दिली जात होती, परंतु इतर कबुतरांना सात प्रकारचे मिश्र खाद्य दिले जात होते. यात तांदूळ, हरभरा, मूग, बाजरी, करार, लाहदरह व ज्वारी यांचा समावेश होता.

Mughal Empire's 20,000 Pigeons

नोकरांना पगार

कबुतरांच्या संगोपनासाठी १५ नोकर नियुक्त करण्यात आले होते. त्यांना लष्करी विभागातून पगार मिळत होता. हा पगार दरमहा २ रुपयांपासून ४८ रुपयांपर्यंत होता.

Mughal Empire's 20,000 Pigeons

संदर्भ

वरील माहिती ‘आइन-ए-अकबरी’ मध्ये नमूद आहे.

Mughal Empire's 20,000 Pigeons

स्त्रीलंपट मुघल बादशहा, जो नग्नावस्थेत येत होता दरबारात

The Infamous Mughal Emperor | esakal
हेही वाटा -