सकाळ वृत्तसेवा
मुघल बादशाहांच्या हरममध्ये हजारो महिला असायच्या. हरम म्हणजे एक प्रकारे मुघलांच्या अय्याशीचा अड्डा असायचा.
नाचगाणं, संगीत, मदिरा, व्यभिचार.. हरममध्ये सगळंकाही खुलेआम चालायचं.
बादशहाची मर्जी मोडली जाऊ नये, यासाठी हरममधील महिला तत्पर असायच्या.
मुघल बादशहा आपल्या बेगमांशिवाय इतरही महिलांना आपल्या भोगाची शिकार करायचे.
यादरम्यान काही महिला किंवा दासी गर्भवती व्हायच्या. त्यामुळे महिलांच्या गर्भपाताची प्रकरणं कायम सुरु असायची.
गर्भपातासाठी काही विशिष्ट फुलांचा उपयोग होई. याशिवाय जंगली झाडांच्या बिया, फळं, लिंबू याचा विशिष्ट पद्धतीने वापर केला जायचा.
वर्मवूड, पुदिना, पपई, क्रोकस या हार्सटेलसारख्या गोष्टींचा हरममध्ये वापर केला जात होता.
गर्भ रोखण्यासाठी किंवा गर्भपात करण्यासाठी पपई किंवा अननस या फळांचा वापर कित्येक वर्षांपासून केला जायचा.
सोबत पुदिना आणि अजवाईनंच्या पाण्यानेही गर्भ रोखण्याचा प्रयत्न केले जात होते.
अशा प्रकारे महिलांचा गर्भ रोखला जात असे किंवा मग गर्भपात केला जायचा.
सगळ्या औषधांचा नेमका कसा वापर व्हायचा, याबाबत मात्र स्पष्ट माहिती नाही. तेव्हाचे हकीम याबाबत ठरवत असत.