'या' मुघल बादशहाचे स्वतःच्या मुलीसोबतच होते अनैतिक संबंध?

सकाळ वृत्तसेवा

जहांआरा

शाहजहांची मुलगी जहांआरा ही मुघल कालखंडातील एक अत्यंत श्रीमंत, विदुषी आणि राजकारणात सक्रिय असलेली स्त्री होती.

दारा शिकोह

फेब्रुवारी 1633 मध्ये दारा शिकोहच्या विवाहासाठी 32 लाख रुपये खर्च झाले. यातील 16 लाख रुपये जहांआराने स्वतःच्या खजिन्यातून दिले होते.

मुघल साम्राज्य

दारा शिकोहचे लग्न हे मुघल इतिहासातील सर्वात महागडं लग्न मानलं जातं – ज्यामध्ये जहांआराची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

शाहजहां आणि जहांआरा

इतिहासकार फ्रांसुआ बर्नियरच्या मते शाहजहां आपल्या मुलीवर अत्यंत प्रेम करत होते. हे प्रेम ‘सामान्य’ वागणुकीच्या पलीकडे आहे का, यावर वाद आहेत.

जेवणाचे नियंत्रणही जहांआराकडेच

राजभोजनामध्ये काय बनवायचं, त्यात काय असेल, काय नसेल – हे सर्व जहांआरा ठरवायची. ती दरबारातील अतिशय प्रभावशाली व्यक्ती होती.

नाजायज संबंधांची अफवा का पसरली?

बर्नियरने लिहिलं की दरबारी अफवा होत्या की शाहजहां आणि जहांआरा यांच्यात अनैतिक संबंध होते. मात्र या गोष्टी ऐकीव होत्या.

आयुष्यभर अविवाहित का राहिली?

काही इतिहासकारांच्या मते तिला तिच्या दर्जाचा पुरुष मिळालाच नाही. काहींच्या मते तिने सत्तेच्या समीकरणासाठी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

मुलींचं लग्न म्हणजे धोका

मुघल परंपरेनुसार मुलीचं लग्न जर योग्य नात्यात केलं गेलं नाही, तर तिचा पती साम्राज्यावर हक्क सांगू शकतो – म्हणूनही मुली अविवाहित राहायच्या.

निकोलाओ मनूचीचा विरोध

मनूचीने बर्नियरच्या मतांवर टीका केली. त्याच्या मते जहांआराचे प्रेमसंबंध होते, पण शाहजहांच्या भीतीने तिचे प्रियकर गुपचूप भेटत असत.

मनूचीचे दावे – प्रेम आणि गुप्त भेटी

मनूचीच्या नोंदींनुसार जहांआरा पूर्णतः एकटी नव्हती. तिचे प्रेमसंबंध होते, पण तीने ते सार्वजनिक कधीच केले नाहीत.

सत्य की अफवा?

काही गोष्टी दस्तऐवजांमध्ये आहेत, काही फक्त परकीय प्रवाशांच्या टिपणांमध्ये. त्यामुळे शाहजहां-जहांआरा नातं अजूनही गूढ आहे.

सत्ता, संपत्ती आणि सन्मान यांचा संगम

जहांआराने अनेक सामाजिक कार्ये केली, राजकारणात सक्रिय राहिली. इतिहास तिला एक बुद्धिमान, सशक्त आणि शहाणी स्त्री म्हणून ओळखतो.

मुघलांना स्त्रीयांमधलं काय आवडायचं?

<strong>येथे क्लिक करा</strong>