IPL 2024 मधून बाहेर होणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ!

प्रणाली कोद्रे

सनरायझर्स हैदराबादचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेतील 57 व्या सामन्यात 8 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाने लखनौ सुपर जायंट्स संघाला 10 विकेट्सने पराभूत केले.

Abhishek Sharma - Travis Head | X/IPL

सातवा विजय

हा सनरायझर्स हैदराबादचा 12 सामन्यांपैकी सातवा विजय होता. त्यामुळे त्यामुळे आता त्यांचे एकूण 14 गुण झाले आहेत.

Abhishek Sharma - Travis Head | X/IPL

मुंबईचं आव्हान संपलं

यामुळे आता मुंबई इंडियन्सचे मात्र 17 व्या हंगामातील आव्हान अधिकृतरित्या संपले आहे.

Mumbai Indians | Sakal

मुंबईवर नामुष्की

मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 मधून बाहेर होणारा पहिलाच संघ ठरला आहे.

Mumbai Indians | Sakal

मुंबईची कामगिरी

मुंबईने 8 मे पर्यंत 12 सामन्यांपैकी 8 सामन्यात पराभव स्विकारले आहेत, तर अवघे 4 विजय मिळवले आहेत.

Mumbai Indians | Sakal

मुंबईचे गुण

त्यामुळे त्यांचे सध्या 8 गुणच असून त्यांनी उर्वरित तिन्ही सामने जिंकले तरी 12 गुणच मिळवता येणार आहे.

Mumbai Indians | Sakal

...म्हणून मुंबई बाहेर

मात्र सध्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या सघांचे 16 गुण आहेत, तर हैदराबादचे 14 गुण आहेत. याशिवाय अन्य 6 संघांनाही 14 गुणांपर्यंत पोहचण्याची संधी आहे. त्यामुळे मुंबई स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.

Mumbai Indians | Sakal

IPL मध्ये सर्वात कमी डावात 200 षटकार मारणारे भारतीय क्रिकेटर

Sanju Samson | Rajasthan Royals | Sakal