मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचं रौद्र रुप

संतोष कानडे

मुंबईमध्ये दुपारी तीन वाजल्यानंतर वातावरणात बदल झाला आणि निसर्गाचं रौद्र रुप बघायला मिळालं.

घाटकोपर हायवे पोलीस क्वार्टर पेट्रोल पंप येथील होल्डिंग पडल्यामुळे काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

अनेकजण होर्डिंग खाली दबले गेले आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

वडाळा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. श्रीजी टॉवरच्या शेजारील कार पार्किंग साठी बनविण्यात येत असलेले बांधकाम कोसळले आहे. 

कामगार आणि रस्त्यावरील नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कॅमेऱ्यामध्ये ही दुर्घटना कैद झाली आहे.

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. टॉवर खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. 

मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना घडलेल्या आहेत.

अलिबागमध्येही सायंकाळी जोरदार वारा सुटला होता. पावसाने ढग भरून आले होते.