संतोष कानडे
नामदेव शास्त्री हे भगवानगडाचे महतं आहेत. धनंजय मुंडेंना दिलेल्या समर्थनामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर गडावर राजकीय सभा होऊ देणार नाही, अशी भूमिका नामदेव शास्त्रींनी घेतली होती
त्यामुळे पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात संघर्ष झाला. शेवटी २०१७ मध्ये पंकजा यांना सावरगाव घाट येथे भगवान भक्तीगड स्थापन करावा लागला.
तेव्हापासून नामदेव शास्त्री हे अध्यात्माकडे वळले होतं. कीर्तन, प्रवचन, सप्ताह यामध्येच ते दिसून यायचे
नामदेव शास्त्रींनी पुन्हा एकदा भूमिका बदलली का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण गडावरुन त्यांनी राजकीय विषयाला हात घातला आहे.
नामदेव शास्त्री सानप यांना न्यायाचार्य ही पदवी आहे. वाराणसी विद्यापीठाची न्यायाचार्य ही पदवी त्यांनी संपादन केली
नामदेव शास्त्री यांनी एम.ए. केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पीएचडी पदवी संपादन केली.
मराठी आणि संस्कृत विषयाचा त्यांना व्यासंग आहे. ज्ञानेश्वरीवर ते प्रवचनं देत असतात.
एकीकडे नामदेव शास्त्री यांच्या नावासमोर न्यायाचार्य ही पदवी लावली जाते, मात्र दुसरीकडे क्रूर हत्या प्रकरणातील आरोपींच्या बाजूने विधान केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत