Anushka Tapshalkar
दरवर्षी भारतात २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जातो. यानिमित्त भारतातील सुंदर आणि नयनरम्य गावांबद्दल जाणून घेऊया.
"आशियातील सर्वात स्वच्छ गाव" म्हणून ओळखले जाणारे मावलिनॉंग तेथील स्वच्छता, पारंपरिक खासी घरे, नोहावेत लिविंग रूट ब्रिज यासाठी प्रसिद्ध आहे. या गावाची पर्यावरणपूरक जीवनशैली सगळ्यांनाच प्रेरणा घेण्यासारखी आहे.
अपातानी जमातीचे घर असलेले झिरो हिरव्यागार शेती, वैविध्यपूर्ण सण आणि अनोख्या आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. हे गाव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकित आहे.
थार वाळवंटाच्या मध्यभागी असलेले खिमसर प्राचीन किल्ले, वाळवंटाचे सौंदर्य आणि राजेशाही वारसा यासाठी ओळखले जाते. येथे जिप सफारी किंवा उंटावरून सफर करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे.
मलाणा “टॅबूंचे गाव” म्हणून ओळखले जाते. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे गाव त्याच्या अनोख्या परंपरा आणि सुंदर निसर्गदृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
भारताचे पहिले हरित गाव खोनोमा लोकांच्या एकत्र कामाने निसर्ग वाचवण्यासाठी आदर्श आहे. इथे पर्यावरणाची काळजी घेणे, जंगलात ट्रेक करणे आणि अंगामी जमातीची संस्कृती अनुभवणे शक्य आहे.
कुम्बलंगी हे शांत बॅकवॉटर आणि नारळाच्या बागांनी वेढलेले आहे, जे निसर्ग प्रेमींना परफेक्ट ठिकाण आहे. इथे तुम्ही बॅकवॉटर क्रुझचा आनंद घेऊ शकता, कुम्बलंगी मॉडेल गाव पाहू शकता, आणि पारंपारिक मच्छीमारी पद्धती अनुभवू शकता.
जगातील सर्वात मोठे नदी बेट, माजुली, हे जैवविविधतेचे आकर्षण केंद्र आहे आणि आसामी परंपरांचे सांस्कृतिक केंद्र आहे. येथील चैतन्यशील सत्रे (मठ संस्था) आणि निसर्गरम्य सौंदर्य एक्सप्लोर करण्यासारखे आहे.
गढवाल हिमालयातील हे गाव प्राचीन मंदिरे, पारंपरिक लाकडी घरे आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. शांतता आणि स्थानिक जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर काळाप योग्य ठिकाण आहे.