Monika Shinde
सकाळी १५-३० मिनिटं उन्हात बसल्याने मेंदूत सेरोटोनिन वाढतो. हे हार्मोन आपलं मूड आणि मानसिक ऊर्जा सुधारतं.
हलकासा चालणे, नाचणे, योगा, स्ट्रेचिंग हे सर्व एंडोर्फिन निर्माण करतात. यामुळे तणाव कमी होतो आणि आनंद वाढतो.
हसणं हे हॅप्पी हार्मोन्ससाठी उत्तम औषध आहे! विनोदी चित्रपट पाहा किंवा मित्रांशी मजेशीर गप्पा मारा.
आपुलकीने कुणाला मिठी देणे, लहान बाळाशी खेळणे किंवा पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवणे ऑक्सिटोसिन निर्माण करतो.
थोडं डार्क चॉकलेट किंवा तुमचं आवडतं आरोग्यदायी खाणं मूड सुधारायला मदत करतं.
दररोज १०-१५ मिनिटं शांत ध्यान किंवा डीप ब्रीदिंग केल्याने चिंता कमी होते आणि सेरोटोनिन वाढतो.
कोणतंही एक लहान उद्दिष्ट पूर्ण केल्यावर डोपामिन स्रव होतो. यामुळे आत्मविश्वास आणि आनंद दोन्ही वाढतात.